भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित मातोश्री निलिमाताई शिंदे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती साजरी करण्यात आली.
मातोश्री निलिमाताई शिंदे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय भद्रावती येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंचावर अध्यक्ष प्रा. प्रिया राजन तर प्रमुख मार्गदर्शन डॉ स्वेता शिंदे, अतिथी प्रा. रोशनी शिंदे ह्या उपस्थित होत्या.
थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती,पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित नाटिका विद्यार्थिनींनी सादर केली . प्रमुख मार्गदर्शन करताना डॉक्टर श्वेता शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी समाजसेवेचे व्रत हातात घेऊन मुलींना शिक्षित केले त्यांचा आदर्श स्वीकारला पाहिजे असे सांगितले. या प्रसंगी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोहिणी ठेंगणे हिने केले तर आभार प्रदर्शन कु. भूमिका कोकुडे हिने केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सावित्री च्या लेकी या रॅलीत सहभाग घेतला.






