यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे सांस्कृतिक समितीच्या वतीने शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुले करणाऱ्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी डॉ. अपर्णा धोटे , उज्वला वानखेडे, संगीता जक्कुलवार, कमलाकर हवाईकर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज स्त्रीला सन्मानाचे पद प्राप्त झाले. त्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनात बाळगला पाहिजे , असे मार्गदर्शन केले. डॉ अपर्णा धोटे यांनी “मी सावित्री बोलतोय ” हे एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले. उज्वला वानखेडे यांनी स्त्रीजीवनावर आधारित कविता सादर केली.
फुले यांच्या जयंतीनिमित्त वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भद्रावती येथे झालेल्या परिसंवाद स्पर्धेत महाविद्यालयीन गटात कु. गायत्री पिंपळकर हिने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थिनी कु. प्रणाली जगताप, कु. स्नेहल चौधरी, कु. मोना वर्मा , कु. आचल उईके , चंदन राजभर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर मिनाक्षी गेडाम, नताशा नागरे, दिक्षा , प्रगती, तनिष्का यांनी गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन प्रा. वर्षा दोडके व कु. श्रुतिका नागपूरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण मते यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, हरिहर मोहरकर, भिष्माचार्य बोरकूटे, प्रणिता बोकडे, माधव केंद्रे , डॉ प्रशांत पाठक यांनी परिश्रम घेतले.






