spot_img
spot_img
23.1 C
New York
Friday, July 31, 2026

ग्रंथालयाच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : अभिजीत वंजारी आमदार

सार्वजनिक ग्रंथालय संमेलनाचे थाटात उद्घाटन

विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद जिल्हा भंडारा व मुस्लिम लायब्ररी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक ग्रंथालय संमेलनाचे उद्घाटन मुस्लिम लायब्ररीच्या कल्चरल हॉल सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद जिल्हा भंडारा द्वारा आयोजित सार्वजनिक ग्रंथालय संमेलन मुस्लिम लायब्ररी कल्चरल हॉल भंडारा येथे आज दिनांक १६ डिसेंबरला थाटात संपन्न झाले. या संमेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक दत्तात्रय क्षीरसागर, ग्रंथालय संचालक मुंबई, अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हा ग्रंथालय संघ भंडारा, प्रमुख पाहुणे अभिजीत वंजारी, आमदार विधान परिषद, डॉ गजानन कोठेवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय मुंबई, स्वागताध्यक्ष बंडूभाऊ बारापात्रे, रत्नाकर नलावडे, सहाय्यक ग्रंथालय संचालक नागपूर, सुर्यवंशी साहेब, जनाब नईम रहीम खान, अध्यक्ष मुस्लिम लायब्ररी भंडारा, भाऊराव पत्रे, कार्यवाह नागपूर विभाग, एडवोकेट बेलेकर सर, माजी सहाय्यक ग्रंथालय संचालक नागपूर, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, संपादक, जागृत भारत , प्रा. सातोकर मॅडम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालय शास्त्राचे जनक रंगनाथन व सरस्वती माता यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. स्वागत गीताने पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रंथालय संमेलनात मार्गदर्शन करताना आमदार अभिजीत वंजारी यांनी ग्रंथालय समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मार्गदर्शन करताना दत्तात्रय क्षीरसागर संचालक महाराष्ट्र यांनी ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आपण जबाबदार घटक आहात. आपल्या समस्या सुटल्या पाहिजेत. मी शासन आणि आपल्या मधील दुवा आहे, असे मत व्यक्त केले. डॉ गजानन कोठेवार यांनी अल्प अनुदानावर ग्रंथालय चालवणे कठीण झालेले असून, ग्रंथालयासमोरील समस्या फार मोठ्या आहेत. मात्र शासनाला संवेदनशील होवून ग्रंथालयाच्या समस्या सोडवाव्याच लागतील, असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना धनंजय दलाल यांनी क्षिरसागर साहेबांनी ग्रंथालयाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करावेत व संबंधित मंत्रीमहोदय यांना अवगत करावे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार हटवार , सचिव यांनी केले तर अधिवेशनाबद्दलची भूमिका राजू मासुरकर समन्वयक यांनी स्पष्ट केली. सूत्रसंचालन सुधनवा चेटुले नागपूर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व ग्रंथलय कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष रमेश गोमाशे , उपाध्यक्ष अशोक हुमने, समन्वयक राजू मासुरकर, सचिव राजकुमार हटवार, शेषराव शिवणकर, संघटक महेंद्र जुमळे, सय्यद सोहेल, रंजीत सेलोकर, कुसुमताई कांबळे, भावनाताई बागडे, प्रज्ञा गेडाम, राजश्रीताई मासुरकर तसेच विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद भंडारा चे सर्व पदाधिकारी , मुस्लिम लायब्ररी भंडाराचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!