शेगाव टेमुर्डा वाहतूकी साठी पर्यायी रस्त्याचा उपयोग करण्याची प्रशासनाची सूचना

उद्या दि. १६ डिसेंबर २०२३ ला दुपारी ३ वाजता केंद्रिय मंत्री हरदिपसिंग पुरी ( पेट्रोलियम, नैसर्गिक वायु आणि गृहनिर्माण ) यांचा खेमजई येथे भारत सरकार तर्फे चालविण्यात येणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रा निमित्त दौरा असल्यामुळे. व मंत्री यात राबविल्या जाणाऱ्या विविध योजणांची माहिती देणार असल्यामुळे शेगाव ते टेमुर्डा हा रस्ता खेमजई मार्गे वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. तरी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासी तथा वाहतूकदार यांनी शेगाव सालोरी भटाळा टेमुर्डा या मार्गाने प्रवास करावा असे पोलीस प्रशासन चंद्रपूर यांचे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.






