भद्रावती : येथे ग्रॅनेडस क्रिकेट क्लब च्या ग्राउंड वर घेण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत इनरव्हील क्लब भद्रावतीचा संघ विजयी झाला. प्रथमच भद्रावती येथे महिला क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला. या क्रिकेट संघाचे उद्घाटन डॉ माला प्रेमचंद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ अमित प्रेमचंद, मेघा शेंडे मॅडम, रमेश खातखेडे सर उपस्थित होते.

यात इनरव्हील क्लब भद्रावतीचा क्रिकेट संघ तसेच लोकमत सखी मंचचा क्रिकेट संघ यांच्यात सामना झाला. या महिलांच्या चुरशीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात इनरव्हील क्लब संघाने विजय संपादन केला.
इनरव्हील क्लब क्रिकेट संघाने टास जिंकून आधी गोलंदाजी केली. १० ओव्हरच्या झालेल्या सामन्यात लोकमत सखी मंच क्रिकेट संघाने १० ओव्हर मध्ये ४ विकेट गमावून ६४ रन प्राप्त केले. इनरव्हील क्रिकेट संघाने संघाने ६.३ ओव्हर मध्ये २ गडी गमावून ६५ रन प्राप्त केले. यात इनरबल क्लब भद्रावती चा महिला संघ विजयी झाला. इनरव्हील क्रिकेट महिला संघात कॅप्टन म्हणून वर्षा धानोरकर यांनी काम पाहिले. तसेच या संघात वर्षा पढाल, विजया साव, जयश्री कांबळे, मनीषा ढोमणे, तृप्ती हिरादेवे, कविता सुफी, रश्मी बीसेन, विश्रांती उराडे, उषा जाधव, विभा बेहरे, प्रतिभा मानकर या खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन दाखवत विजय संपादन केला.
या प्रसंगी इनरव्हील च्या अध्यक्ष स्वाती चारी , सचिव प्रेमा पोटदुखे, कोषाध्यक्ष वैशाली तेलंग यांनी महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन दिले.

लोकमत सखी मंच तर्फे विजयी संघाला बक्षीस प्रदान करण्यात आले. डॉ मला प्रेमचंद तर्फे बेस्ट प्लेयर अवार्ड विजया साव यांना पारितोषिक देण्यात आले. पंच म्हणून समीर बल्की यांनी उत्तम रीतीने काम सांभाळले. हा क्रिकेट महिला क्रिकेट सामना होण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी सचिन सरपटवार यांनी सहकार्य केले.






