spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

चिमूर-वरोरा रस्त्याच्या कामासाठी शेगावात चक्काजाम

दोन तास वाहतुक ठप्प

राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

वरोरा : तालुक्यातील शेगाव बु. येथे आज दि. १३ डिसेंबर ला बसस्थानक शेगाव बु येथे चिमूर-वरोरा महामार्ग ३५३ ई चे मागील ७/८ वर्षां पासून अर्धवट काम त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे कित्तेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले असून मागील २ महिन्या पासून रस्त्याचे काम करणाऱ्या एस. आर. के. कंपनी चे पूर्ण काम बंद केले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेला, प्रवाशांना, विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याच्या विरोधात हे आंदोलन शेगाव येथील नागरिक आणि परिसरातील त्रस्त नागरिक यांनी केले होते.

सुमारे २ तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलन पूर्ण होत पर्यंत शेगाव मधील संपूर्ण व्यापारी मंडळींनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. नंतर स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांचे मध्यस्थी ने राष्ट्रीय महामार्गा चे उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यात अभियंता बोबडे यांनी येत्या आठ दिवसात कामाला रस्त्याच्या कामावर नवीन कंपनीची नियुक्ती करुन येत्या मे महिन्याच्या शेवट पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल.


शेगाव मध्ये उडणाऱ्या धुळी साठी रोज रस्त्यावर पाणी मारण्यात येईल व भेंडाला जवळ रस्त्याच्या मधात गरज नसताना उभी असलेली मशीन लवकरात लवकर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात येईल अशा स्वरूपाचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनात शेगाव येथील नागरिक, परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!