विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद भंडारा यांचे आयोजन…
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न….
विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद जिल्हा भंडारा आणि मुस्लिम लायब्ररी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक ग्रंथालय संमेलन दिनांक १६ डिसेंबर व १७ डिसेंबर २०२३ ला मुस्लिम लायब्ररी कल्चरल हॉल भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे.
ग्रंथालय चळवळ सशक्त व्हावी व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सांगोपन चर्चा व्हावी व समस्या सोडविता याव्या या उदात्त हेतूने विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद जिल्हा भंडारा व मुस्लिम लायब्ररी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक ग्रंथालय संमेलन २०२३ चे आयोजन करण्यात आलेले आहे. दि १६ डिसेंबरला ला ग्रंथालय संमेलनाचे उद्घाटन मा. दत्तात्रय क्षीरसागर साहेब ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, आमदार अभिजीत वंजारी नागपूर , प्रदीप दाते वि.सा.संघ नागपूर, डॉ गजानन कोठेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबई, नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पार्टी , सुनील मुंडे खासदार भंडारा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच अनेक भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
तर दुसऱ्या दिवशी दि १७ डिसेंबरला आमदार सुधाकर अडबाले, आमदार नरेंद्र भोंडेकर, माननीय दत्तात्रय क्षीरसागर साहेब ग्रंथालय संचालक मुंबई, श्रीपाद अपराजित संपादक महाराष्ट्र टाइम्स यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचा विषय राज्यातील सर्वाधिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांची उपेक्षा व त्यावरील उपाय योजना तसेच सार्वजनिक ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत करण्याकरिता ग्रंथालयीन व्यवस्थापन, कर्मचारी, लोकसहभाग, लेखक, वृत्तपत्र आणि शासनाची भूमिका हा विषय घेतला आहे.
या परिसंवादात डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर संपादक जागृत भारत, भाऊराव पत्रे कार्यवाह नागपूर विभाग ग्रंथालय संघ, प्रभाकर घुगे अकोला, डॉ. कापर्डे रामटेक, सईद शेख, धनंजय दलाल भंडारा आदी मान्यवर परिसंवादात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे प्रगट मुलाखत, स्मृती पुरस्कार वितरण आदी अनेक कार्यक्रम होणार आहेत.
या दोन दिवसीय ग्रंथालय संमेलनाला महाराष्ट्रातील सर्वच ग्रंथालयाचे पदाधिकारी , कर्मचारी तसेच ग्रंथालय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात मोठ्या संख्येत उपस्थित राहावे , असे आवाहन विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद जिल्हा भंडाराचे अध्यक्ष रमेश गोमासे , सचिव राजकुमार हटवार तसेच समस्त पदाधिकारी यांनी केले आहे.






