महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर सर्वच कर्मचारी वर्गाला १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन दिनांक १२ डिसेंबर २०२३ नागपूर येथे करण्यात आले आहे.

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने १९८२ ची जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी या मागणीसाठी या आधी सुद्धा अनेक मोर्चे मुंबई , नागपूर येथे करण्यात आलेले आहे. त्याची दखल न घेतल्याने पुन्हा एकदा नव्याने दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार ला जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्वच कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा नागपुरात अधिवेशनावर धडकणार आहे.
या मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या कार्यानी पुनित झालेल्या सेवाग्राम वर्धा येथून मशाल यात्रेच्या रूपाने झाली आहे. जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व सहकारी यांचे नेतृत्वात सुरू झाली आहे. लाखोच्या संख्येने राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन त्सुनामी वादळ नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. मशाल यात्रेच्या माध्यमातून शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. जुन्या पेन्शन साठी या आधी अनेक समित्या शासनाने स्थापन केल्या, त्याचा अहवाल सुद्धा शासनाला प्राप्त झाला. पण अजूनही कुठली ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन द्यावी अन्यथा ‘होट फार ओ पी एस’ च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा जागर केला जाईल.
मशाल यात्रा ११डिसेंबर२०२३ ला नागपूर येथे पोहोचणार असून १२ डिसेंबरला जुन्या पेन्शन साठी पेन्शन जनक्रांती चा मोठा मोर्चा विधिमंडळावर धडकणार आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी या पेन्शन त्सुनामी वादळाला महाराष्ट्रातील शिक्षक भारती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जुनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ , सर्वच प्राथमिक शिक्षक संघटना, अनेक शिक्षक संघटनांनी तसेच राज्य कर्मचारी महासंघाने सुद्धा समर्थन दिले आहे. या मोर्चात जुन्या पेन्शन चा प्रश्न निकाली काढण्यात आला नाही, तर राज्यभरातील सर्वच विभागाचे कर्मचारी पुन्हा एकदा १४ डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करणार आहेत. या मोर्चात आपल्या म्हातारपणाची काठी व आपला संवैधानिक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांनी या महा मोर्च्यात जुन्या पेन्शन साठी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक भारती संघटना नागपूर विभागातर्फे करण्यात आले आहे.






