spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

चंद्रपूर येथे ध्वजदिन तथा जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा

माजी सैनिकांचा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या हस्ते सत्कार

चंद्रपूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चंद्रपूर तर्फे जिल्हा नियोजन भवन येथे ध्वज दिन तथा जिल्ह्यातील माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा न्यायाधीश सुमित जोशी, विपिन पालीवार, कॅप्टन दीपक लिमसे, किशोर हेमके, विजय तेलरांधे आदी मान्यवर उपस्थित होते. या सैनिकांच्या जिल्हा मेळाव्यात १९७१ साली झालेल्या युद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या माजी सैनिक पांडुरंग हेमके, नवराते व श्याम तिरसुळे या माजी सैनिकांचा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम अमर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थित मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी तीन युद्धात सहभागी झालेले भद्रावती येथील जिल्ह्यातील एकमेव माजी सैनिक पांडुरंग हेमके यांच्याशी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी संवाद साधून युद्धातील आठवणी त्यांच्याकडून जाणून घेतल्या. यावेळी माजी सैनिक पांडुरंग हेमके यांनी युद्धातील आठवणींना उजाळा दिला. सदर मेळाव्याला जिल्ह्यातील ३८ माजी सैनिकासह इतर नागरिक उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!