भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रका नुसार यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आज दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवार ला संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी प्रा. डॉ सुधीर मोते , शेखर जुमडे हे उपस्थित होते.

संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सुधीर मोते यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या कामगिरीमुळेच तुकाराम महाराजांची अभंग गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा शेखर जुमडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन हरिहर मोहरकर यांनी केले . कार्यक्रमाला शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग समितीचे प्रा. पोटदुखे, बोरकूटे, दोडके, बोकडे , चव्हाण आदींनी सहकार्य केले.






