spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

‘एक वही एक पेन’ अभियान राबवुन हेल्पिंग हँड्स तर्फे महामानवास अभिवादन

भद्रावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक एनजीओ हेल्पिंग हँड मल्टीपर्पस सोसायटी, भद्रावती द्वारा ‘एक वही – एक पेन’ हा अनोखा अभियान घेऊन महामानवास अभिवादन करण्यात आले.

एक वही एक पेन या अभियानांतर्गत हेल्पिंग हँड च्या चमूने भद्रावती वासियांना या महापरिनिर्वाण दिनी वही आणि पेन अर्पण करावी असे आवाहन केले होते. या अभियानाला शहरातील अनेक नागरिकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियाना मार्फत जमा झालेल्या वही आणि पेन भद्रावती परिसरातील, खेड्यापाड्यातील अनेक गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या अनुषंगाने वाटप करण्यात येणार आहे. दिवसभर पावसाची साथ असूनही हे अभियान अगदी खंबीरपणे पार पाडणारे राजरत्न पेटकर, कृतांत सहारे, सुकेशिनी मानकर, प्राची वेल्हेकर, रीता सहारे, प्रणय कांबळे, बादल बाराहाते, आकाश सिंग, सुरज कांबळे, वैभव पाटील, वैभव मानकर व हेल्पिंग हँड संस्थेतील इतर सदस्य आणि भद्रावती वासियांनी आपले मोलाचे योगदान दिले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!