भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व्दारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे , प्रमुख अतिथी प्रा. किशोर ढोक, डॉ सुधीर मोते, उज्वला वानखेडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

महामानव, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व पुजना नंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली . मोना वर्मा, तन्वी माडेकर, नम्रता काकडे, प्रणाली जगझाप, श्रुतिका नागपुरे, मीनाक्षी गेडाम , भाग्यश्री वीजकापे आदी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर काही विद्यार्थ्यीनींनी याप्रसंगी गीत गायन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रमुख अतिथी प्रा. किशोर ढोक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भीष्माचार्य बोरकूटे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयदा अन्सारी आणि परणीता संगेल या विद्यार्थीनींनी केले. आभार प्रदर्शन प्रा. राकेश आवारी सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग समिती च्या प्रा. प्रेमा पोटदूखे , वर्षा दोडके, डॉ ज्ञानेश हटवार, हरिहर मोहरकर, तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






