भद्रावती : आम आदमी पार्टी भद्रावती शिष्टमंडळांनी दि, २२ नोव्हेंबर ला प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन विभाग चंद्रपूर यांना निवेदन दिले. कर्नाटका एमटा भद्रावती मध्ये खाजगी गाड्या विना परवाना चालत आहे. कायद्याप्रमाणे कोणत्याही कंपनी किंवा खाणीमध्ये फक्त परमिट गाड्या चालू शकतात. हे प्रकार वर्षानुवर्ष चालत असुन कायद्याचे उल्लंघन सुरू आहे.

ट्रकांमध्ये ओवरलोड कोळसा भद्रावती ते चंद्रपूर आणि भद्रावती ते माजरी मार्ग चालत असल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ओव्हरलोड ट्रकांमुळे कोळसा भरभरून जात असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण सुद्धा या भागात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याविषयी चे त्रास होत आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी कडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देऊन या विषयावर चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी भद्रावती शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, ॲड. तब्बसूम शेख, शंकर सरदार, योगेश मुरेकर, दिपक बारशेट्टीवार, आशिष तांडेकर, अनिल कुमार राम, सरताज शेख, अतुल भैसारे, निखिल जट्टलवार, वसीम कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, उपस्तीथ होते.






