ग्रामपंचायत च्या कारभारात झालेल्या घोटाळ्याची चोकशी करा :- गावाकऱ्यांची मागणी
वरोरा तालुक्यातील दादापूर धानोली गट ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. या ग्रामपंचायत मध्ये संबंधित सरपंचाने मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरतफार केल्याचा आरोप गावकरी यांनी ग्रामसभेत केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी शेगाव पोलीस यांचे मदतीने सायंकाळी 5 वाजता चोकशीचे मागणी करून मासिक सभा पार पाडण्यात आली.
सविस्तर माहिती अशी कि दादापूर धानोली गट ग्रामपंचायत मध्ये काही आर्थिक व्यवहार करण्यात आले होते. पण ते व्यवहार करताना त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे गावाकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच ग्रामपंचायत ने कामासाठी काही साहित्य घेतल्याची पावत्या जोडलेल्या आहे. पण संबंधित साहित्याची खरेदीच झाली नसल्याची आरोप गावाकऱ्यांनी गावच्या सरपंच्यावर केल्याने सभेत मोठ्या प्रमाणात गदारोह निर्माण झाला होता व त्यात ठराव घेऊन झालेल्या आर्थिक अफरतफेरेची चोकशी करून दोषीवर योग्य ती कारवाही करण्यात यावी अशी मागणी गावकरी यांनी केली आहे






