यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनीयमीत करुन देशाला अर्पित करण्यात आले. तेव्हापासुन २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पथसंचलन आदी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी डॉ ज्ञानेश हटवार, प्रा. रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ जयंत वानखेडे यांनी “संविधानाने दिलेले कर्तव्य व अधिकाराचे पालन सर्वांनी केले पाहिजे” असे आवाहन केले. डॉ ज्ञानेश हटवार यांनी “संविधानाने आपल्या जगण्याचा मुलमंत्र दिला. हक्क, कर्तव्य व अधिकार हे कायद्याच्या चौकटीत बहाल केले” असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर ढोक यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. नरेश जांभुळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला समस्त प्राध्यापक तथा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. पोटदुखे, देशमुख सर , लांबट सर , नंदनवार सर, प्रवीण सोनवणे यांनी परिश्रम घेतले.






