spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

संविधान दिनानिमित्त हेल्पिंग हँड्स तर्फे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

भद्रावती : शहरातील स्थानिक एनजीओ हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावतीने ७४ व्या संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर ला शहरामध्ये जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी संविधान नागरिक संवर्धन समिती भद्रावती यांचे मोठे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. संगीता बांबोडे आणि मिलिंद वाघमारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष कृतांत सहारे होते.

वकृत्व स्पर्धेसाठी मुख्य पर्यवेक्षक म्हणून ॲडवोकेट शुष्मा, जवादे आणि वनश्री तुर्के यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली, गट अ वय ८ ते १६ मध्ये पहिला क्रमांक काव्या कवाडे, दुसरा क्रमांक समीक्षा आमटे व गौरवी भिसे तर तिसरा क्रमांक प्रकाश उंबरे यांनी पटकाविला.

गट ब वय १६ वर्षावरील मध्ये पहिला क्रमांक किरण वाकुडकर व प्रलय मशाखेत्री, दुसरा क्रमांक संविधान अवताडे तर तिसरा क्रमांक प्रेम जपोतवार यांनी पटकविला. सर्व विजेत्यांना रोख रकमेचे बक्षीस फयाज शेख व पि.के. ब्रदर्स कडून देण्यात आले. संविधान समितीच्या वतीने सर्व विजेत्यांस आकर्षित ट्रॉफी देण्यात आली. अध्यक्षीय संदेशामध्ये हेल्पिंग हँड्स एनजीओचे अध्यक्ष कृतांत सहारे यांनी संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन वकृत्व स्पर्धेचे महत्त्व सांगताना, संविधानाबद्दल सर्वसामान्य पर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी व आजच्या तरुण पिढीला संविधानाबद्दल जागृती निर्माण करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे संबोधले.

कार्यक्रमाचे संचालन मनोज पेटकर तथा आभार सोनाल उमाटे यांनी मानले. संस्थेचे सहकारी अंकित तोडे, रीता साहरे, सागर निरंजने, आझाद कुडसंगे, प्राप्ती देवगडे, सुकेशनी मानकर, प्रशिक लोणारे, सूरज कांबळे, प्रशांत सातपुते, कैश शेख, स्नेहा सातपुते, स्वप्निल मत्ते, राजरत्न पेटकर, प्रणय कांबळे, चेतन रामटेके, शरद सपाटे, रोशन रणवीर, तुषार दुर्गे, दीपक आवटे, निखिल उंबरकर आणि इतर सर्वांनी ही वकृत्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यास अतिशय मोलाचे सहकार्य केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!