spot_img
spot_img
26.5 C
New York
Friday, August 7, 2026

महसूल विभागाने जप्त केलेला ट्रक तहसील कार्यालयातून चोरी

कार्यालयातील शिपाई, ट्रक मालक, ट्रक चालक सह अन्य एकाला अटक

भद्रावती : गौण खनिजाची तस्करी करणारा ट्रक महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात लावण्यात आला मात्र हा ट्रक तहसील कार्यालयातून शिपायाच्या मध्यस्थीने ट्रक मालकासह अन्य दोघांनी चोरी करून घेऊन गेले हा प्रकार तहसीलदाराला माहिती होताच महसूल विभागाने पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून चौघांना अटक करण्यात आली व ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

सुरेश तेलंग (शिपाई ) तहसील कार्यालय, रंजन कांबळे वय ४६ ट्रक मालक, जीवन गायकवाड वय ३६ ट्रकचालक, परमेश्वर चौगुले वय ४३ राहणार भटाळी असे आरोपींचे नाव आहे. ट्रक क्रमांक एम एच ३१ एम ३४७२ नी शेगाव परिसरात गौण खनिजाची चोरी करत असल्याची माहिती दिनांक सात नोव्हेंबरला महसूल विभागाला मिळाली त्या आधारे महसूल पथकाने कारवाई करून ट्रक जप्त केला व तहसील कार्यालयात लावण्यात आला व या प्रकाराबाबत ट्रक मालक रंजन कांबळे याला नोटीस देण्यात आला. दिनांक २० नोव्हेंबरला सायंकाळ दरम्यान तहसील कार्यालयातील शिपाई सुरेश तेलंग याला सोबत घेऊन वरील आरोपींनी हा ट्रक चोरी केला हा प्रकार येतीलच कार्यरत शिपाई गजानन क्षिरसागर यांनी बघितला व या घटनेची माहिती तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना दिली तसेच क्षिरसागर यांनी ट्रक चोरी गेल्याची तक्रार भद्रावती पोलिसात केली.

ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागातील अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुधरी, योगेश घाटोळे , निकेश ढेंगे यांनी चोरी केलेला ट्रक भटाळी येथून जप्त करून यातील चारही आरोपींना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!