spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

वरोरा (मोहबाळा) एमआयडीसी तील रस्ते देत आहेत अपघाताला आमंत्रण

भविष्यात होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण ?

भविष्यात होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण ?

वरोरा- वरोरा तालुक्यातील मोहबाळा एम आय डी सी मधून जाणारा हा मुख्य रस्ता आहे तसेच एम आय डी सीतुन गांव खेड्यात जाणाऱ्या रस्त्याची दुरर्वस्था दैनंदिन बिघडत जात आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुक चालकाला कमरडे मोडावं लागत आहे. मोहबाळा एम आय डी सी रस्त्यात खड्डे भले मोठे पडल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहन यांना कसरत करत जावं लागत आहे. मोहबाळा ते निमसडा टी पॉईंट या रस्त्याची पाहणी केली तर रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच समजायला मार्ग नाही त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनांना फार मोठया खडयातून वाट काढत मार्ग शोधावं लागत आहे.त्याच्यात एम आय डी सी मध्ये येणारे अवजड वाहनामुळे छोटया वाहनाना एम आय डी सीतील रस्ते धोक्याचे ईशारे देत आहे.

वरोरा (मोहबाळा) एम आय डी मध्ये अंतर्गत रस्त्यावर असणारे विद्युत पोल हे नावापुरता बसवलेले आहे रात्रीच्या अंधारातून एकादा मोटारसायकलस्वार जर कां आपलं काम संपवून घरी परतत असेल तर त्याला वाट काढत रस्त्यात भले मोठे पडलेल्या खडयातुन जावं लागत आहे त्याच्यात समोरून येणाऱ्या एखाद्या वाहनामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.यांच प्रमाणे रस्त्यावर लाईट नसल्याच गैरफायदा घेत गांव खेड्यात व एम आय डी सी मध्ये चोरी होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे एम आय डी सी मुख्य रस्त्यावर असणाऱ्या झाडी झूडपे जास्त वाढल्यामुळे मधल्या डीवायडवरून क्रॉस होणाऱ्या वाहनांना जीवावर आपल वाहन क्रॉस करावे लागत आहे.साईड ने कोणती वाहन जात येत असेल ते दिसण्यात अडचण निर्माण होत आहे.

मोहबाळा, दहेगाव, निमसडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडताना म्हणले कि, खड्डेमय रस्ते, रस्त्यानजीक वाढलेली झुडुपे आणि बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट यांमुळे गावकऱ्यांच्या आणि मार्गावरील इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. रस्त्यांच्या या दुरावस्थेबाबत वरोरा (मोहबाळा) एम.आय.डी.सीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा अनुभव आम्हाला आला आहे.

रस्त्यात पडलेल्या खड्याचे काम पक्के नं करता लोकांची समज म्हणून भुरूम माती टाकून खड्डे बुजविण्याचे काम तात्पुरता केले होते परंतु पहिल्या पावसाच्या आगमनाने त्याठिकाणी टाकलेली माती भुरूम वाहून गेल्याने त्या ठिकाणी मोठ मोठ खड्डे पडले आहेत. स्थानिक रहिवाशी त्यांचप्रमाणे वरोरा, मोहबाळा,दहेगाव साईडने येणाऱ्या जाणाऱ्या दु चाकी, चारचाकी व मोठया अवजड वाहनांना एम आय डी सी अपघाताला मोठे आमंत्रण देत आहे. भविष्यात होणाऱ्या अपघाताला सर्वस्वी जबाबदार कोण ? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!