पहिल्याच दिवशी 7325 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी
भद्रावती बाजार समिती पदाधिकारी, संचालक व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदैव कार्य करीत राहतील : रविंद्र शिंदे
स्थानिक भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार नंदोरी अंतर्गत मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज टाकळी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ दि. 21/11/2023 रोज मंगळवारला करण्यात आला. पहिल्याच दिवशी 51 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. कापूस खरेदी प्रसंगी आयोजित कार्यक्रमास अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तसेच उद्घाटक भद्रावती बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे उपस्थित होते.
भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीव्दारे पहिल्याच दिवशी रुपये 7325 प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करण्यात आले. कापूस विक्रीसाठी आलेले शेतकरी स्वप्निल ईखारे, कोंढा, शुभम कार्लेकर, कोंढा, मोहम्मद खलील यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन भद्रावती यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास भद्रावती कृषी बाजार समितीचे संचालक गजानन उताणे, मनोहर आगलावे, कान्होबा तिखट, परमेश्वर ताजणे, शामदेव कापटे, प्रविण बांदुरकर, भद्रावती कृ.उ.बा. समिती सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज प्रा. लि. चे अविश बाहे, सुभाष बाहे, दिपक गौरकार, किशोर वालदे, प्रशांत कारेकार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनासाठी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी प्रविण राहुलगडे, विलास पालकर, अरूण पाठक, मुकेश वांढरे, रमेश सकिनवार यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रम प्रसंगी भद्रावती बाजार समिती पदाधिकारी, संचालक व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदैव कार्य करीत राहतील असे रविंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी आपला शेतमाल मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज टाकळी येथे विक्रीस आणावा, असे संयुक्त आवाहन भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे, उपसभापती अश्लेषा भोयर (जिवतोडे), सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.






