spot_img
spot_img
23.1 C
New York
Friday, July 31, 2026

राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने अशोक जाधव सन्मानित

जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव यांना डॉ. जाकीर हुसैन महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कला, आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास गोरख पाटील हे होते. सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयमचे अध्यक्ष डॉ. हाजी हारून शेख यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, माजी सरपंच नेमिचंद उखा सोनार, माजी आमदार कैलास पाटील, चोपडा, जळगाव जिल्हा अप्परकोषागार शकील देशपांडे, नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर, डॉ. राहुल मयूर एम. डी. पंथ जळगांव, उमवी चे सिनेट सदस्य विष्णू भंगाळे जळगाव, मजीद जकरिया जळगाव, फारूक शेख जळगाव,बबन खा लालखा तडवी लोकनियुक्त सरपंच अडावद, शबनम समीर दफेदार पुणे, विकास झेंडे पुणे, नाना डोंगरे अहमदनगर, डॉ शरीफ बागवान, अजमल शाह, अनिता चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक पटेल सर यांनी तर प्रथम सूत्रसंचालन शबनम दफेदार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी मांडले तर डॉ. जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले.

अशोक दिगांबर जाधव महाराष्ट्र गौरव २०२३ यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मित्र परिवारातर्फे व ऑल इंडिया बंजारा टायगर्स भारत व महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह कर्मचारी बांधव तथा संस्थापक अध्यक्ष, सचिव कडुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!