………………………………..
भद्रावती येथील निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्रांगणात भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती तर्फे दीपोत्सवाचे आनंददायी पर्वावर दिवाळी पहाट ” सूर तेच छेडीता ” व सायंकाळी कवी संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती नीलिमाताई शिंदे , प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुषमाताई शिंदे , डॉ सौ प्रियाताई शिंदे , प्राध्यापक डॉ कार्तिक शिंदे , डॉ वैभव शिंदे , श्री धनराज अस्वले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्याकडे दिवाळी हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. तो सण सर्वांसोबत साजरा व्हावा तसेच रात्रीची संस्कृती नष्ट व्हावी , या संकल्पनेतून डॉ विवेक शिंदे यांनी भल्या पहाटे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉ विवेक शिंदे यांनी हा कार्यक्रम भद्रावतीच्या इतिहासात दिवाळी निमित्त भल्या पहाटे कार्यक्रम होण्याचे हे द्वितीय वर्ष असून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही देत उपस्थित सर्व गायक कलाकारांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सदर कलाकारांनी सुमधुर निवडक मराठी – हिंदी गीतांची श्रवणीय महफील सादर करण्यात आली. यामध्ये गायक प्राध्यापक विवेक सरपटवार, गायिका सौ वैदेही सरपटवार, आशुतोष सरपटवार, तबलावादक बालाजी ताडे, आर्गन वादक संतोष रामटेके, गायक मनोज कृष्णन, प्राध्यापक डॉ राजेश हजारे यांनी गीत सादर केले.
सायंकाळी दिवाळी च्या संध्येला मान्यवरांच्या उपस्थितीत बहारदार कविसंमेलन घेण्यात आले. यात भद्रावती नगरीतील अनेक कविमंडळी यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता कवीवर्यांनी सादर करत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यात वि. सा. संघ भद्रावती, झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती च्या मान्यवर कवींनी सहभाग घेतला. डॉ. विवेक शिंदे यांनी आपली कविता सादर करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव प्राध्यापक डॉ कार्तिक शिंदे व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल. एस. लडके सर यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सन्माननीय अध्यक्ष डॉ विवेक शिंदे सर, सचिव डॉ कार्तिक शिंदे सर, डॉ वैभव शिंदे सर, श्रिमती निलिमाताई शिंदे , सुषमाताई शिंदे, डॉ प्रिया शिंदे, डॉ विलास बांदुरकर, प्राचार्य डॉक्टर डॉक्टर एल. एस. लडके, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, डॉ अनिल शिंदे, श्री सुधीर वर्मा पीएसआय, भद्रावती, श्री बंग साहेब, दिलीप शिंदे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाकरिता भद्रावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत सर्व शाळा व महाविद्यालय चे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचलन प्राध्यापक डॉ सुधीर मोते व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ कार्तिक शिंदे यांनी केले. सकाळी झालेल्या सुश्राव्य गीतांची दिवाळी पहाट व सायंकाळी कवी संध्या कविसंमेलनाची खमंग चर्चा संपूर्ण शहरात होत होती.
या काय हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राध्यापक डॉ सुधीर मोते, प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, प्रा.डाॅ नासरे, प्रा डॉ शित्रे , प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक संदीप प्रधान, श्री अजय आसुटकर, श्री शरद भावरकर, श्री मानकर, श्री तेलंग व श्री आखतकर यांनी अथक परिश्रम घेतले.






