ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांची संख्या दिवसेन दिवस वाढत असताना, वाघाच्या हल्ल्यात जनावरे तसेच माणसे मारल्याची बातमी आपण नेहमीच ऐकत असतो. पण आज दि. १४ नोव्हेंबर ला दुपारी वाहणगाव शेत शिवारात जंगला लगत दोन वाघांच्या अस्तित्वाची झुंझार लढत झाल्याची घटना समोर आली आहे. वहाणगाव परिसरातील सुभाष दोडके यांच्या पूर्वेस असलेल्या शेतात दोन वाघांची झुंज सुरू असल्याची बातमी परिसरात पसरली, दरम्यान वाघाची दुर्मिळ लढत बगायला मिळणार म्हणून परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली. पण या मटका व बजरंग या दोन वाघाच्या अस्तित्वाच्या लढाईत आठ वर्षीय बजरंग नामक वाघ गंभीर रित्या जखमी झाल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तसेच मटका नामक वाघ हा देखील गंभीर जखमी झाला असून तो पण जवळच एका झुडपात दडून बसला असल्याची प्राथमिक माहिती मिडली आहे. ही बाब वन अधिकारी याना माहिती होताच वन विभाग अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दखल झाली असून पुढिल तपास वन विभागाचे अधिकारी करत आहे.






