राम मंदिर परिसरात शपथ घेत केली नवीन शाखा स्थापन
वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथे आज दि. ११ नोव्हेंबर ला सायंकाळी राम मंदिर च्या सभा मंडपात जिल्यातील तसेच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बजरंग दलाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी गावातील ३०/४० युवकांनी विश्व हिंदु परिषदेच्या बजरंग दलामध्ये प्रवेश केला.
या कार्यकमाला चंद्रपूर जिल्हा सह मंत्री अभिषेक मोतलग, प्रफुल भास्करवर, विभाग सयजोग पराग दवंडे, तालुका अध्यक्ष तेजस रेड्डी, गो रक्षक बंटी खडके, बजरंग दल तालुका अध्यक्ष तेजस रेड्डी, विश्व हिंदु परिषद वरोरा मंत्री अमोल चनकापुरे, वरोरा बालोपासना प्रमुख गोलू गायकवाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर साहिल नरड, ओंकार लोडे, सचिन नरड, अभिषेक फुलकर, भूषण कामडी, तुषार कोसूरकर, ओम कापटे, साहिल बालपांडे, गोलू दडमल, रोशन साखरकर आदी सह अन्य युवक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.






