ट्रॅफिक पोलीस ची कामगिरी बजावतानाच दिले वर्दीतल्या माणुसकीचा परिचय

शेगाव:- आज सकाळ पासून शेगाव परिसरात एक मनोरुग्ण महिला विवस्त्र फिरत होती. सगडे तिच्या कडे एक मनोरुग्ण म्हणून संकुचित नजरेने बगन्याचे काम करीत होते. ही माहिती शेगाव पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅफिक हवालदार या पदावर काम करीत असलेले नितीन कुरेकार यांना मिडाली असता, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर २ तासा नंतर सदर मनोरुग्ण महिला वरोरा चिमूर रोड वर चालताना त्यांना दिसली असता त्यांनी ट्रॅफिक ची कामगिरी बजावत असतानाच ते काम बाजूला ठेऊन सगाड्यात आधी त्या महिलेला स्वखर्चाने शर्ट आणि पॅन्ट घेऊन दिला. व त्या महिलेला तो व्यवस्थित रित्या परिधान करण्यास मदत सुध्दा केली. त्या वेळी त्यांच्या सहकार्याला शेगाव पोलीस स्टेशन येथील होमगार्ड हेमंत पाटील हे सुद्धा होते.
एरवी ट्रॅफिक पोलीस म्हंटल तर सगड्याच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. पण शेगाव चे ट्रॅफिक पोलीस नितीन कुरेकार यांनी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन शेगाव वासियांना घडवून दिले. त्या मुळे त्यांच्या या कार्याला व वर्दीतल्या या माणुसकीला एक सलाम.






