विविध वीस पाळणे, तंबोला, फटाका शो विशेष आकर्षण…
विविध कार्यक्रमांमधून तरुणाईला स्टेज शो ची संधी……
भद्रावती येथे दिवाळी निमित्त रोटरी क्लब व्दारे तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे 13 नोव्हें. ते 19 नोव्हें. या सात दिवसात रोज सायंकाळी सहा ते दहा पर्यंत रोटरी उत्सव दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रोटरी मेळाव्याद्वारे भद्रावतीकरांना दिवाळीची सात दिवसांची दिवाळी मेजवानी मिळणार आहे. यासोबतच विविध प्रकारचे २० पाळणे, तंबोला व फटाका शोचे विशेष आकर्षण राहणार आहे.
यात प्रथमच काही झुल्चंयांचे आकर्षण रहाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच अशा विविध प्रकारच्या 20 पाळण्यांचा भद्रावतीकरांना आनंद लुटता येणार आहे.
विविध प्रकारचे वीस पाळणे
रेंजर, टोरा टोरा ,आकाश पाळणा, ब्रेक डान्स ,कोलंबस, ड्रॅगन ट्रेन ,मेरी गो राऊंड, सलाम बोट, बेबी ट्रेन, क्रॉस व्हील अशा विविध पाळण्यांचा यात समावेश आहे.
लाईटनिंग लेझर शो
या सर्वच पाळण्यांना विविध प्रकारची रोषणाई करण्यात आली असून हा लाईटनिंग लेझर शो परिसर दिवाळीच्या दिवसात प्रकाशमय करणार आहे. यात यावर्षी मौत का कुवा हा आकर्षक व रोमहर्षक शो राहणार आहे. यात मौत का कुवा मध्ये चार कार व चार मोटरसायकल एकाच वेळी चालवून रसिकांचे मनोरंजन करणारा आहे. मौत का कुवा सुद्धा विशेष आकर्षण राहणार असून यामध्ये चार कार व चार मोटरसायकल एकाच वेळी सहभागी होणार आहे.
तरुणाईला स्टेजची संधी
रोटरी उत्सव दिवाळी मेळ्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मुख्यत्वे करून तरुणाईला स्टेजवर आपली कलाकृती सादर करण्याची संधी देण्यात आलेली आहे. यात तरुणांच्या विविध कलागुणांना वाव मिळणार आहे.
फूड झोन
सायंकाळी सहा ते दहा पर्यंत सतत सात दिवस चालणाऱ्या या वेळात फूड झोन मधील विविध व्यंजनांचा आस्वाद या ठिकाणी येणाऱ्या लाखो नागरिकांना घेता येणार आहे.
लहान मुलांसाठी विशेष खेळ व व आकर्षण
या मेळाव्यात लहान मुलांसाठी आकर्षक असे खेळ आयोजित करण्यात आले असून भूत बंगला शो व लहान पाळण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. यात तंबोला हा आकर्षक खेळ प्रकार खेळला जाणार आहे. त्यात आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रोटरी उत्सव मेला हा प्रसस्त अशा तालुका क्रीडा संकुल येथील पंधरा एकर जागेत रोटरी मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून तयारी पूर्णत्वाला आलेली आहे. ४० ते ५० ट्रक द्वारे मेळ्याचे साहित्य या ठिकाणी आलेले आहे. या अभुतपुर्व रोटरी उत्सवात नागरिकांनी या मेळ्याचा लाखोच्या संख्येने आनंद लुटावा व ही दिवाळी स्मरणात ठेवावी असे आवाहन रोटरी क्लब भद्रावतीचे अध्यक्ष अनिल धानोरकर , सचिव सुधीर पारधी, कोषाध्यक्ष विक्रांत बिसेन, रोटरी क्लब माजी अध्यक्ष तथा उत्सव चेअरमन डॉक्टर माला प्रेमचंद व समस्त रोटरी सदस्यांनी केले आहे.






