जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर व यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीयतांदूळ क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावर निवड झाली आहे
नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावतीच्या इंडोअर स्टेडियम येथे पार पडलेला जिल्हास्तरीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते यात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे १९ वर्षे वयोगटात कार्तिक खेमसकर या खेळाडूंची , अनुष्का काळे ह्या खेळाडूंची निवड झाली. सतरा वर्षे वयोगटात आशिष देऊळकर या खेळाडूची विभागीय स्तरावर निवड झाली. तर १४ वर्ष वयोगटातील यश टेकाम या खेळाडूची विभागीय स्तरावर निवड झाली.
तायक्वांडो क्रीडा प्रकारात विविध वयोगटात विभागीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे , सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे , प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक प्राध्यापक रमेश चव्हाण, डॉ ज्ञानेश हटवार, डॉ सुधीर मोते, माधव केंद्रे , किशोर ढोक, सतीश केमस्कर, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील क्रीडास्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.






