spot_img
spot_img
24.7 C
New York
Saturday, August 1, 2026

“दीपस्तंभ दीपोत्सव २०२३” दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न..

महाराष्ट्रातील अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती….

शैक्षणिक “दीपस्तंभ दीपोत्सव 2023” या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. सतत दर्जेदार अंकाची निर्मिती व प्रकाशन करणाऱ्या अक्षरधन पब्लिकेशन च्या वतीने ६ नोव्हेंबर २०२३ ला दीपोत्सव २०२३ या दर्जेदार राज्यस्तरीय दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक प्रा.विजय लोंढे हे प्रमुख अतिथी लाभले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुदाम साळुंखे अहमदनगर यांनी “वाचन संस्कृती विकसित व्हावी व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवनिर्मितीची ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही सतत मागील दहा वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहोत. त्यातीलच हा एक उपक्रम असल्याचे नमूद केले.”
प्रकाशन सोहळ्यात प्रा. विजय लोंढे पुणे, मुख्य संपादक सुदाम साळुंखे, प्रकाशक सौ. प्रतिभाताई साळुंखे, नवनाथ सुर्यवंशी, संपादक मंडळ डॉ बाबासाहेब सिंगोटे व संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक साहित्यिक प्रामुख्याने उपस्थित होते.

या दिपोत्सव दिवाळी विशेषांकत लेख विभाग, महिला जगत, बाल नगरी, चित्र कला अशा विविध विषयांवर सर्वांग पूर्ण दर्जेदार व निवडक साहित्य संपादक मंडळांनी यात समाविष्ट केले आहे. हा दिवाळी अंक आपल्या अभिव्यक्तीचा ऊत्तम नमुना आहे.
या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात प्रा.विजय लोंढे पुणे येथील साहित्यिक यांनी मार्गदर्शन केले. डॉ ज्ञानेश हटवार भद्रावती यांनी “दिपोत्सव दिवाळी विशेषांक २०२३ हा शिक्षक व विद्यार्थ्यांना साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रेरणादायी आहे, हा उपक्रम नवोदित साहित्यिक मंडळी साठी एक अभूतपूर्व पर्वणी आहे, असे मनोगत व्यक्त केले.

शैक्षणिक दीपस्तंभ परिवाराने राज्यभरातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ देण्याचे व्रत गेल्या अनेक वर्षापासून हाती घेतले आहे. आजपर्यंत त्यांनी १९ राज्यस्तरीय दर्जदार अंक प्रकाशित केले आहेत. या दीपोत्सव २०२३ या अंकामध्ये १२१ साहित्यिक, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना समाविष्ट केले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ ज्ञानेश हटवार, सौ केशनी हटवार, सौ उज्ज्वला वानखेडे व शर्विल हटवार, गावंडे मॅडम यांचे साहित्य प्रकाशित झाले आहेत.

या दिमाखदार सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ बाळासाहेब सिंगोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली गोजवडकर यांनी केले. हा दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यासाठी मुख्य संपादक सुदाम साळुंखे, सौ प्रतिभा साळुंखे व संपूर्ण संपादक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रकाशन सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी शिक्षक, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!