इंडोअर स्टेडियम भद्रावती येथे आयोजन
क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर व यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भद्रावती येथील नीलकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या इंडोअर स्टेडियम येथे संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक डॉ विशाल शिंदे सहसचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तथा अध्यक्ष तायक्वांडो असोसिएशन चंद्रपूर अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे सर प्रमुख अतिथी सुधीर वर्मा ए.पी. आय. भद्रावती , डॉ ज्ञानेश हटवार, सतिष खेमस्कर सचिव तायक्वांडो असोसिएशन चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनुप तालुक्यातील या क्रीडा प्रकारातील खेळाडू आलेले होते. उद्घाटन प्रसंगी डॉक्टर विशाल शिंदे यांनी तायक्वांडो हा क्रीडा प्रकार स्वसंरक्षणासाठी उत्तम प्रकार आहे . यात खेळाडूंनी आपले करिअर करावे असे मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी खेळातील सातत्य कायम ठेवून स्वतःचे व शाळेचे नाव लौकीक करावे व उन्नती साधावी असे मार्गदर्शन केले. ए पी आय सुधीर वर्मा यांनी मोबाईलच्या युगात आपण क्रीडांगणावर वेळ घालून शारीरिक कसरत करता हे महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुधीर मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र नंदनवार यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील तायक्वांडो क्रीडा खेळाडू मोठ्या संख्येत उपस्थित होते.






