अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी नुकतीच ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची निवड केलेली आहे. त्यात भद्रावती येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण चिमूरकर यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्य म्हणुन निवड झाली.
ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ नुसार ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केली.
सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले प्रवीण चिमूरकर हे पुरोगामी पत्रकार संघ शाखा भद्रावतीचे अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे ते चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी ग्राहकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला असून, ग्राहक सेवेसाठी ते तत्पर आहेत.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर वर त्यांची सदस्य म्हणून निवड झाल्याने पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र सचिव निलेश ठाकरे, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीचे सचिव डॉ ज्ञानेश हटवार, कार्याध्यक्ष मनोज मोडक, उपाध्यक्ष शिरीष उगे, आशिष कोटकर, हर्षल रामटेके, उमेश कांबळे तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीचे अध्यक्ष वामण नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, सुदर्शन तनगुलवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असलेले प्रवीण चिमूरकर यांचे निवडीबद्दल अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






