क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर च्या वतीने जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या जिल्ह्यास्तरीय क्रीडा स्पर्धेत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खोखोच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय प्राप्त केला. ते चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
विभागस्तरावर करणार आहेत.
चंद्रपूर क्रीडा संकुल येथे
आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय १९ वर्षीय मुलांच्या खोखो क्रीडास्पर्धत यशवंतराव शिंदे भद्रावती च्या १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या खोखो स्पर्धेत नागभीड ,मुल तालुक्याला पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतीम सामन्यात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती मुलांच्या संघाने सिंदेवाही संघाचा पराभव करत जिल्हा स्तरावर आपला विजय संपादित केला.
आता यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा खोखो संघ नागपूर विभागास्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
या क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे तसेच प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण , माधव केंद्रे, शेखर जुमडे, शुभम सोयाम , अशोक पिदूरकर आणि समस्त प्राध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ जयंत वानखेडे व क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक रमेश चव्हाण यांना दिले .






