भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती, जि. चंद्रपूर येथे दिनांक ०२ ऑक्टोंबर, २०२३ रोज सोमवारला सकाळी ठीक ८.०० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे प्रमुख अतिथी डॉ. सुधीर मोते, अनिल मांदडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. अनिल मांदडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला शांततेचे व लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ हा संदेश प्रत्येक घरामध्ये पोहचवण्यासाठी कार्य केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमानिमित्त आपण त्यांचे विचारांचा आदर्श अंगिकार करून कृती करावयास हवी. तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांची जयंती संपन्न होईल ,असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील कबड्डी चमूतील मुले व मुली खेळाडूंना क्रीडा किटचे वाटप मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश आवारी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.






