शैक्षणिक क्षेत्रात रोवला मानाचा तुरा..
भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासुन उल्लेखनिय कामगिरी करणा-या निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावतीस गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने ”उत्कृष्ट महाविद्यालय“ पुरस्कार देउन नुकतेच सन्मानित केले आहे ़
अर्धशतकापूर्ती केलेल्या के जी टू पी जी अशी व्यवस्था असलेल्या भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित निळकंठराव शिदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती शिक्षण क्षेत्रात नवनवे प्रयोग करण्यात अग्रेसर आहे . मागील वर्षी राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद बंगलोर द्वारा CGPA 2.94 व B++ श्रेणी ने प्रमाणित झाल्यानंतर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने दिलेल्या उत्कृष्ट महाविद्यालयाच्या सर्वेच्च सन्मानाबद्दल परिसरात व समस्त विद्यार्थ्यी वर्गात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे . या पुरस्काराने महाविद्यालयाच्या गौरवात आणखी एक सन्मानाचा तुरा रोवलेला आहे.
आजवर या महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यानी विद्यापीठाच्या मेरीट यादीत स्थान मिळविलेले आहे . २ विद्यार्थ्यानी सुवर्णपदकावर नांव कोरलेले आहे . या महाविद्यालयाच्या उच्च शिक्षण व संशोधन केंद्रातून तब्बल ३२ संशोधकांनी संशोधन कार्य पुर्ण करुन विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे . हा गोंडवाना विद्यापीठ क्षेत्रातील संशोधन कार्याचे विक्रमाचा बहुमान महाविद्यालयास अल्पावधीतच मिळालेला आहे . राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये महाविद्यालयास मानाचा ”एकक“ पुरस्कार तसेच उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त झालेला आहे . महाविद्यालयाच्या ”शब्दशिल्प“ या वार्षीकांकास विद्यापीठाने दोनदा पुरस्कार देउन गौरवान्वित केले आहे . येथील शिक्षकवृंदाना ”उत्कृष्ट शिक्षक“ पुरस्कार देउन सन्मानित केलेले आहे .
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या १२ व्या वर्धापन दिन सोहळयाच्या निमित्ताने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये २५,०००/- देऊन महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष मा . डाॅ .विवेक शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य, डाॅ . लेमराज लडके यांनी स्वीकारला .
या प्रसंगी व्यासपीठावर आमदार डाॅ . देवराव होळी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी मा . संजय मिना, कुलगुरु डाॅ . प्रशांत बोकारे, विद्यापीठाकडून जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित प्रसिध्द समाजसेवक डाॅ . सतिष गोगुलवार, प्रकुलगुरु डाॅ . श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ . अनिल हिरेखण, तसेच गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे समस्त मान्यवर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर पुरस्कारामुळे आम्हाला उंच भरारी घेण्याची व विद्यार्थीभिमुख शैक्षणिक प्रयोग करण्याची उर्जा नव्याने मिळाल्याची प्रतिक्रिया मा. प्राचार्य, डाॅ लेमराज लडके यांनी नोंदविलेली आहे .
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे मा कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे,
प्रकुलगुरु डाॅ श्रीराम कावळे, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सचिव प्रा . डाॅ . कार्तिक शिदे, सहसचिव प्रा .डाॅ . विशाल शिदे विश्वस्त श्रीमती नीलीमाताई शिंदे , पदाधिकारी, विश्वस्थांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद व समस्त कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.






