spot_img
spot_img
24.9 C
New York
Sunday, August 2, 2026

आमदारांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील खराब रस्त्याने येणार काय? :- अभिजित कुडे

वरोरा तालुका खड्डेमय झाला असून लोकांच्या जिवाचा खेळ सुरू


वरोरा तालुका खड्डेमय झाला असून लोकांच्या जिवाचा खेळ सुरू


वरोरा तालुक्यातील सर्व रस्त्याची दुर्दशा होऊन अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ५ वर्षात विकास कुठे हरवला आहे याचा शोध सर्व सामान्य माणूस घेत आहेत. कुणी रस्ता देता का रस्ता अशी अवस्था आहे. खड्डय़ात आंघोळ करू शकतो अशा प्रकारे रस्त्यातील खड्डय़ात पाणी साचले आहेत. हे रस्ते आहे की स्विमिंग पूल? हा प्रश्न पडतो आहे. संपूर्ण तालुका खड्डेमय झाला आहे तर आमदारांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील खराब रस्त्याने येणार आहे का असा प्रश्न अभिजित कुडे यांनी उपस्थित केला आहे. खराब रस्त्यामुळे बससेवा बंद होत आहेत ही लाजिरवाणी बाब झाली असून लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. एक नाही तर संपूर्ण तालुक्यात हेच चित्र आहे. कित्येक निवेदन दिले आंदोलन केले तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आली नाही. ४१ गावातील रस्त्यासाठी निवेदन दिले गेल्या ३ वर्षात फक्त काही रस्त्याची डागडुजी करून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांची घर भरण्याची काम चालू आहे. त्यामुळे लोकांमधे प्रचंड आक्रोश असून जनता त्रस्त झाली आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांंना सहन करावा लागतो आहे. रस्त्यामुळे अनेक गावातील बससेवा बंद करावी लागली त्यामुळे जीव धोक्यात घालून खासगी वाहनांनी नाईलाजाने विद्यार्थी प्रवास करून आर्थिक भुर्दंड सहन करत शाळा कॉलेज ला जात आहे. झोपा काढत असलेल्या प्रशासनाला धारेवर धरले तरी निधी उपलब्ध नाही म्हणून रस्त्याचे काम थांबले आहे. मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मात्र मिळत नाही. रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते हा प्रश्न पडतो आहे. अनेक अपघात सुद्धा वारंवार घडत असतात, लोकाना मानेचा कंबरेचा त्रास वाढला आहे. लोकांच्या गाड्यांची टप्पर फुटतात इतके सुंदर अवस्था तालुक्यातील रस्त्यांची झाली आहे. लोकप्रतिनिधी झोपेत आहे का त्यांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही काय? स्विमिंग पूल तयार केले आहे असे रस्ते आहे. खड्डे भरल्याच्या नावावर चिखल करून ठेवला आहे. २१ आंदोलन करुन सुद्धा पूर्ण उदासीनता आली आहे. लोकप्रतिनिधी यांनी तालुक्याला वाळीत टाकले आहे का? असा प्रश्न उद्भवला आहे. मात्र लोकप्रतिनिधी जनसंवाद यात्रा काढत आहे त्यांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील या खराब रस्त्याने येणार का? नागरी, माढेळी, उखर्डा, केळी, महाडोळी, हीवरा, पवणी, वाघनख, येवती, बामर्डा, वडगाव, चीकणी, शेगाव, नागरी स्टेशन, आजनगाव, वडगाव, बोपापुर, चारगाव, दादापुर, जडका, कोसरसार, बोडका तालुक्यातील सर्व अंतर्गत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या सर्व रस्त्यासाठी गेल्या २ वर्षात कित्येक निवेदन दिले आंदोलन केले तरी मुर्दाड प्रशासन व लोकप्रतिनिधी झोपेतच आहे. त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा मोठे जनआंदोलन उभारू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!