भाजपचे रमेश राजुरकर यांचा उपक्रम
७५ वरोरा भद्रावती विधानसभा अंतर्गत भद्रावती शहरामधील काही साहित्यिक, उच्चविद्या विभूषित शिक्षकांचा “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत विविध समाजातील शिक्षकवृंदाच्या घरी प्रत्यक्ष भेटी देवून गौरविण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक सुरेश चिकाटे, राजू कांबळे रमेश कुंभारे, भास्कर धकाते यांच्यासह लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार विवेकानंद महाविद्यालयातील डॉ.यशवंत घुमे यांच्या घरी भेटी दिल्या. भेटीदरम्यान सेवानिवृत्त विनोद पांढरे, मायाताई रमेश राजूरकर,प्रा प्रणिता शेंडे यांचा सेवा तथा जनसंपर्क कार्यालय वरोरा येथे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शासनाच्या योजनेची माहिती दिली. सोबतच घर चलो अभियान व सरल ऍप नोंदणी करण्यात आली. सदर उपक्रम राबविताना विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर, शहराध्यक्ष सुरेश महाजन, शहर महामंत्री किशोर गोवरदिपे, अमित गुंडावार, निशांत देवगडे, आकाश वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.






