spot_img
spot_img
24.9 C
New York
Sunday, August 2, 2026

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सदस्य मोहिमेला सुरूवात (जागो ग्राहक जागो)

ग्राहकाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ग्राहक पंचायत चे सदस्य व्हा - वामन नामपल्लीवार, अध्यक्ष

भद्रावती : अखिल भारतीय ग्राहक पंचायत सन १९७४ पासुन संपुर्ण भारत देशात ग्राहक सेवेचे कार्य करत आहे. ग्राहक पंचायत ला ५० वर्ष पुर्ण होत आहे. ग्राहक पंचायत आता सुवर्ण वर्षाकडे वाटचाल करत असुन देशभरात असंख्य ग्राहक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्य होऊन ग्राहकांच्या या चळवळीला गती देण्याचे कार्य करत आहे.

भद्रावती शहरात ग्राहक पंचायत मागील ३४ वर्षापासून काम करत असुन अनेक ग्राहकांच्या समस्या, तक्रारी सोडविल्या एवढेच नाही तर अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याची जाणीव सर्व भद्रावती करांना आहेच. त्यांच्या याच कामाची दखल घेवुन यावर्षी नगरपालिका भद्रावती ने ग्राहक पंचायत भद्रावती ला ‘भद्रावती भुषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोबतच रोजगार मार्गदर्शन शिबीर, नेत्ररोग, कर्करोग आरोग्य शिबीर, हॉलमार्क जनजागृती, सायबर गुन्हा जनजागृती असे अनेक जनजागृती कार्यक्रम घेतले. सोबतच मिठाई, फरसाण दुकानाची तपासणी, पेट्रोल पंप तपासणी, हॉटेलची तपासणी करून ग्राहकांना त्याच्या हक्काचे आणि आरोग्यदायी सुविधा देण्यास कार्य करत असते.

त्यामुळे या वर्षी ची सदस्य नोंदणी ला सुरवात झाली असुन ग्राहक पंचायत चे सदस्य होण्यासाठी ९१५६३०४४३०, ७०२०४६०४३९, ९५५२९००४०२, ८३०८८८७७५२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आजच स्वतः ची नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन ग्राहक पंचायत चे अध्यक्ष वामन नामपल्लीवार, प्रविण चिमुरकर, वसंत वऱ्हाटे, अशोक शेंडे, पुरुषोत्तम मत्ते आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात येत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!