शिक्षक समाजाचा आधारस्तंभ…. डॉ. जयंत वानखेडे
स्थानिक यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, पर्यवेक्षक ताजने सर व प्राध्यापक , शिक्षक यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वयंशासन उपक्रम राबविले. या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य करून शिक्षकांचा अनुभव घेतला. मुख्याध्यापक म्हणून कु. अश्विनी चौधरी तर पर्यवेक्षक म्हणून कु. दिक्षा कांबळे यांनी उत्कृष्ट कार्य केले. इतर सर्व शिक्षकवृदांनी अध्यापनाचे कार्य करून उत्तम भूमिका बजावली.
शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नवोदित भावी शिक्षकवृदांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर काहींनी शिक्षक दिनानिमित्त गीत सादर केले. सहभागी सर्व शिक्षकवृदांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निधी घानोडे व आभार प्रदर्शन कु. शुभांगी पारशिवे हिने मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते






