शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील विविध क्रीडा प्रकारात तालुकास्तरावर विजयी झालेल्या खेळाडूंना क्रीडा किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्षीय भाषणात डॉ कार्तिक शिंदे यांनी ” खेळाडूंनी खेळात सातत्य व चिकाटी ठेवावी , आपल्या क्रीडा प्रकारात यश संपादन करावे” असे सांगितले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील जे खेळाडू विविध क्रीडा प्रकारात तालुका स्तरावर विजयी झाले, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शाळेच्या वतीने त्यांना क्रीडा किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य एम. यु. बरडे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजयी खेळाडूंना क्रीडा किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी “खेळाच्या माध्यमातून स्वतःचे व महाविद्यालयाचे नावलौकिक करावे “असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रमेश चव्हाण यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधव केंद्रे यांनी केले , तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले . कार्यक्रमाला खेळाडू , शिक्षक , प्राध्यापक मोठ्या संख्येत उपस्थित होते.






