कायद्याचे पालन प्रत्येकाने करावे.. डॉ. देव
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व ऑंटी रॅगिंग सेल तथा जिल्हा विधी सेवा समिती चंद्रपूर आणि तालुका विधी सेवा समिती कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर आयोजित केले. सदर कार्यक्रमाकरिता माननीय आर. आर. थोरात (अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा माननीय दिवाणी न्यायाधीश कोरपणा) हे अध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थित होते. तसेच माननीय ए. जे. पाटील (माननीय सहदिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी कोरपणा), माननीय निशा खोब्रागडे (पीएसआय, गडचांदुर), माननीय गोविंद पेदेवाड सहायक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा लालगुडा, महेश धामोरीकर (सचिव, तालुका बार असोसिएशन, कोरपना) व श्री पंढरी मुसळे केंद्रप्रमुख गडचांदूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शैलेंद्र देव हे मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप घोडिले (सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक) यांनी केले. मा. श्री. पाटील साहेब यांनी अँटी रॅगिंग कायदे विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले, तर माननीय खोब्रागडे मॅडम यांनी रस्ते वाहतूक नियम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. माननीय पेद्येवाड साहेब यांनी स्वामी विवेकानंद व आंतरराष्ट्रीय युवा दिवस विषयी मार्गदर्शन केले. माननीय थोरात साहेब यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात रॅगिंग विषयी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व उपस्थितांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक चेतन वैद्य साहेब (अँटी रॅगिंग सेल समन्वयक) कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले . आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर सामूहिक राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कायदेविषयक शिबिराला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






