spot_img
spot_img
25.3 C
New York
Monday, August 3, 2026

आंतरराष्ट्रीय उद्यमशिलता दिन संपन्न …

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथील माजी विद्यार्थी संघटना आणि करिअर अँड प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी आंतरराष्ट्रीय उद्यमिता दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा अभिनय क्षेत्रात व इंटिरियर डेकोरेशन सारख्या उद्योग क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे श्री अंकुश अंडरस्कर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक श्री रामकृष्ण पटले व करिअर अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक श्री पवन चटारे हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बुद्धिमत्ता दिवस या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्यमशीलते कडे वळण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले. देशात वाढणाऱ्या बेरोजगारीला सामोरे जाताना विद्यार्थी जीवनापासूनच उद्यमशीलतेचे गुण अंगी बाळगावे व शिक्षणासोबतच उद्यमशीलतेकडे सकारात्मक दृष्टीने बघून जीवनात मार्गक्रमण करावे या आशयाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अंकुश अंडरस्कर यांनी विद्यार्थ्यांना केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव यांनी उद्योगांना नोकरी एवढीच प्रतिष्ठा मिळावी याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री पवन चटारे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम आयोजित करण्याकरिता श्री रामकृष्ण पटले तथा श्री पवन चटारे यांनी विशेष प्रयत्न केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!