गोंदिया व्हिजुक्टा जिल्हा अधिवेशन गोंदिया येथे नुकतेच संपन्न झाले . या अधिवेशनात गोंदिया जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्राध्यापक पवन कटरे यांच्यावर सोपवण्यात आली.
व्हिजुक्टाचे केंद्रीय सचिव सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर अशोक गव्हाणकर यांच्या अध्यक्षतेखातील संपन्न झालेल्या गोंदिया जिल्हा व्हिजुक्टा अधिवेशनात गोंदिया जिल्ह्याची नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारणीत प्राध्यापक पवन कटरे यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी प्राध्यापक पवन कटरे यांनी गोंदिया जिल्ह्यात जुनिअर कॉलेज मधील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी व्हिजूक्टा सदैव कार्यरत राहील असे अस्वस्थ केले. प्रा. पवन कटरे हे कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी आहेत हे विशेष.






