ग्रामीण रुग्णालय भद्रावती चार उपक्रम
नुकतेच ग्रामीण रुग्णालय, भद्रावती च्या प्रांगणात आजादी का अमृत महोत्सव व रक्षाबंधन सणानिमीत्त उदात्त हेतूने आरोग्य तपासणी करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सप्रेम भेट दिली. दुसऱ्यांचे आरोग्य जपता जपता त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून शासनाने मोहीम राबवली आहे.
सदर मोहिमेअंतर्गत, बीपी, शुगर , इसीजी तपासणी मुख कर्करोग तपासणी, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, स्तन कर्करोग तपासणी इ. तपासण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग सर यांनी केले असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामान्य रुग्णालय चंद्रपूर tata trust चे संपूर्ण पथक हे लाभले. तसेच कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय भद्रावती चे दंतशल्य चिकित्सक डॉ. केशवाणी सर, डॉ. खाडिलकर मॅडम, डॉ. सावे मॅडम, कु.सपना पचारे , मोहिनी सिस्टर, पूनम अहुजा सिस्टर, अनिता सिस्टर, उर्मिला सिस्टर, मोनाली ठाकरे(LT), डिम्पल चहारे(HLL), स्वेता कंचरलावार NCD Counsellor ई. उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घेतला.






