भद्रावती शहरात इनरव्हल क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना रमा गर्ग यांनी “इनरव्हल क्वड सामाजिक क्षेत्रात काम करते. आपणास जी संधी मिळाली, त्याचे सोने करावे,” असे मार्गदर्शन केले.
भद्रावती येथे फेरील्याॅंड स्कूलच्या सभागृहात दिनांक ११/०८/२०२३ ला इनरव्हल क्लब भद्रावतीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमा गर्ग, डिस्ट्रिक्ट सचिव, चंद्रपूर, पाष्ट प्रेसिडेंट सुनिता खंडाळकर, सचिव मनीषा ढोमणे, प्रेझेंट प्रेसिडेंट स्वाती चारी, सचिव प्रेमा पोटदुखे या मंचावर उपस्थित होत्या.
पास्ट प्रेसिडेंट यांनी आपल्या पदाचा कार्यभार प्रेझेंट प्रेसिडेंट स्वाती चारी यांच्याकडे दिला. तर पाष्ट सचिव यांनी आपल्या पदाचा कार्यभार प्रेझेंट सचिव प्रेमा पोटदूखे यांच्याकडे सोपविला. यावेळी नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमा गर्ग मॅडम यांचा परिचय सचिव प्रेमा पोटदूखे यांनी करून दिला. प्रेझेंट प्रेसिडेंट स्वाती चारी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनीता खंडाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्रांती उरकांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रश्मी बीसेन यांनी केले. कार्यक्रमाला वंदना धानोरकर, वर्षा धानोरकर , कीर्ती गोहणे, तृप्ती हिरादेवे , कविता सुफी, राजश्री बत्तीनवार, कौशल आंटी, केशनी हटवार , शुभांगी बुरकुटे , विभा बेहरे , कीर्ती आखाडे आदी उपस्थित होत्या.






