spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

आदिवासी जागतिक दिनानिमित्त माजरी परिसरात मणिपूर घटनेचा तीव्र निषेध

ग्रामीण परिसरातील हजारों युवक -युवती व महिलांचा सहभाग

भद्रावती : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ सायंकाळी विविध ग्रामीण स्तरावरून आक्रोश रॅलीत प्रत्यक्षपणे सहभाग दर्शवत महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे असलेले निवेदन माजरी पोलीस ठाणेदार व प्रशासनाला सादर दि.९ ऑगस्टला आदिवासी जागतिक दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी यावर्षी सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक, नृत्य या प्रकारचा सांस्कृतिक रचनात्मक कुठलाही प्रयोग सादर न करता, राज्य, देश, प्रादेशिक विभाग, जिल्हा विभाग विविध पातळीवर सातत्याने आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय तत्वतः जल, जंगल, जमीन बळकावण्याचा दृष्टिकोन बाळगून यासोबतच आदिवासी समाजातील व्यक्ती व महिलां, युवती व बालकांवर सातत्याने होणारे मानसिक आर्थिक, शारीरिक शोषण, विटंबना, मानसिक हनन होईल. अशा अन्याय अत्याचारात्मक घटना घडवून आणणे. मणिपूर सारख्या मोठ्या प्रमाणात लांचनास्पद घटना व दंगली घडवून आणणे ह्या बाबी आदिवासी समाजाच्या दृष्टीने व राष्ट्रहिताच्या दृष्टीने गंभीर असून त्याची दखल आदिवासी जागतिक स्तरावरून होणे गरजेचे आहे. भारत देशात प्रथम स्थानी महामहीम राष्ट्रपती आदिवासी समाजातील महिला प्रामुख्याने प्रमुख पदी असून मनिपुर सारख्या घटना घटनांची योग्य दिशेने चौकशी होणे गरजेचे आहे. घटना घडवून आणणाऱ्या व प्रत्यक्षात व अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्वांचीच उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अशा घटना घडूच नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते निर्भीड नेतृत्व राष्ट्रीय स्तरावरील द ट्रायबल पोस्ट मीडियाचे कार्यकारी संपादक, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी निघालेल्या आक्रोश रॅली ला संबोधित केले.

आदिवासी समाज बांधव आक्रोश रॅलीचे नेतृत्व रॅलीचे सहयोजक माजी पंचायत समिती सदस्य, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संघटन प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते चिंतामण आत्राम यांनी केले. याप्रसंगी पळसगाव, नागलोन, पाटाळा माजरी विविध स्तरावरील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, आदिवासी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मणिपूर येथील गंभीर घटना लक्षात घेता त्या घटनेचा निषधात्मक बाब म्हणून उचित न्यायाच्या संदर्भात कुठल्याही स्तरावर आनंद उत्सव व गाजावाजा न करता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीत हजारो आदिवासी समाज बांधवांचा सहभाग होता. सदर घटनेचा इतर विविध संघटनानी ही समर्थनार्थ आपल्या निषेधात्मक भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. प्रसंगी पोलीस स्टेशन माजरी ठाणेदार व पोलीस प्रशासनाकडे मणिपूर घटनेच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

९ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनानिमित्त मणिपूर घटनेच्या संदर्भात निघालेल्या आक्रोशी रॅलीत चिंतामण आत्राम यांचे नेतृत्वा मध्ये दशरथ गेडाम, सुनिल सिडाम, कृनाल आत्राम सदानंद सिडाम, मृणाल आत्राम, विजय येलके, सूर्यभान आत्राम, कवडू गेडाम, विशाल उईके, प्रदीप मेश्राम, प्रकाश सिडाम, प्रकाश मेश्राम, जंगलू आत्राम, लक्ष्मण आत्राम, गंगाधर आत्राम, पुरुषोत्तम चांदेकर, तुषार आत्राम शुभम सोयाम, शोभाताई सिडाम, प्रेमिला आत्राम, मिराबाई मेश्राम, मिराताई पेंदोर, गंगाताई आत्राम, रामचंद्र मडावी, निर्मलाताई आत्राम, मोरेश्वर मडावी, मनोज उईके, आकाश उईके, सूरज गेडाम, अक्षय मडावी राकेश उइके, अक्षय कुळसंगे, दिप सलाम, दिलीप कुळसंगे, हंसराज आत्राम, शकुनी मडावी, निर्मलाताई किनाके, किरण किनाके, मंगला कुळसंगे, मायाबाई मडावी, सूर्यभान आत्राम, लक्ष्मण आत्राम, उत्तम आत्राम, नागलोन कुमरे, सिडाम, आत्राम व अन्य, पाटाळा येलके, चांदेकर, गेडाम, मडावी व अन्य, असंख्य युवावर्ग, महिला वर्ग, पळसगाव, माजरी वस्ती सर्व आदिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.विजय येळके, सोमदेव चांदेकर, विनोद कुंमरे मुरलीधर गेडाम, धनराज कुंमूरे ,दिगंबर शिडाम, सदानंद सिडाम, विशाल उईके, हंसराज आत्राम, कवडू गेडाम ,पुरुषोत्तम चांदेकर, अमित आत्राम, धनराज गेडाम , कैलाश परचाके, शुभम सोयाम, विनोद परचाके, मारुती कुळसंगे, मनोज परचाके ,कैलाश परचाके, विजय आत्राम, देविदास आत्राम ,हर्षल आत्राम ,सूर्यभानआत्राम ,विलास आत्राम, शाम मेश्राम, गंगाधर आत्राम ,देविदास आत्राम ,मारुती कुरसंगे शुभम सोयाम गोलू मडावी सचिन उत्तम उत्तम आत्राम, लक्ष्मण आत्राम, युवराज आत्राम, रोहित आत्राम ,सुरज परचाके राहुल परचाके, शरद सिडाम, अतुल परचाके ,रोशन परचाके, प्रकाश कन्नाके ,प्रवीण किनाके ,आकाश तोडासे, आचारी पडाल ,स्वप्निल साठे ,सचिन साठे ,बंटी साठे ग्रामपंचायत सदस्य मंगला आत्राम, शोभाताई सिडाम (महिला संघटक) मीराताई पेंदोर ,प्रेमिलाताई आत्राम (समाज संघटक) अर्चना मडावी, माया मडावी ,बेबी गेडाम ,विमल सीडाम ,शालिनी आत्राम ,विमल आत्राम आदीं प्रमुख कार्यकर्त्यांनी आक्रोश रॅलीमध्ये सहभाग दर्शवत अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!