भद्रावती : श्री सद्गुरू गजानन महाराज शेगांव विहिरगाव संस्थान वतीने डॉ. अंकुश अगलावे दाम्पत्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. कोरोना काळातील समाज कार्याबद्दल प्रेरित होउन श्री. सद्गुरु गजानन महाराज संस्थान बिहीरगांवच्या वतीने दांपत्याचा सत्कार करण्यात आला. डॉ.आगलावे यानी आपल्या जीवन कार्यात श्री गुरुदेव सेवा मंडल व केंद्रीय मानव अधिकार संगठन वतीने ने अनेक गोर गरीबांची सेवा केली. त्याबद्दल हा सत्कार संस्थान विश्वस्तांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी सद्गुरु गजानन महाराज संस्थान चे विश्वस्त उपश्तित होते.






