महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस, गडचांदूर येथे उपक्रम……
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस, गडचांदूर येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 सप्ताह दिनांक 24 जुलै ते 29 जुलै 2023 दरम्यान साजरा करण्यात आला. या सप्ताहा अंतर्गत दिनांक 28 जुलै 2023 ला महाविद्यालया मध्ये एक व्याख्यान आयोजित केले होते. सदर व्याख्यान विध्यार्थी व शिक्षक – शिक्षकेत्तर वृंदा साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व त्याची अंमलबजावणी संदर्भात फार उपयुक्त ठरले.
या विषयावर व्याख्यान देण्याकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जीवती येथील प्राचार्या डॉ. शारदा शाक्य मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या चिताडे मॅडम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव मंचावर उपस्थित होते . मान. चिताडे मॅडम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे उपयुक्त आहे, ते राबविणे ही काळाची गरज आहे या संबंधात आपके विचार व्यक्त केलेत. प्रमुख मार्गदशिका डॉ. शाक्य मॅडम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 मधील सर्व बाबी उदाहरणं देऊन स्पष्ट केल्यात. विध्यार्थी आपल्या पायावर उभा राहण्या साठी हे धोरण किती आवश्यक आहे, हे समजावून सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषांणातून डॉ. देव यांनी या धोरणाचा विध्यार्थ्यांना कसा फायदा होईल व विध्यार्थी कसा स्वावलंबी होईल या बद्दल विस्तृत विचार मांडलेत.
कार्यक्रम यशस्वी होण्या करिता IQAC चे समन्वयक वानखेडे सर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. घोडीले सर यांनी तर आभार श्री. वानखेडे सर यांनी मानलेत. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विध्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्ष केत्तर वृंद उपस्थित होते.






