spot_img
spot_img
26.2 C
New York
Sunday, August 2, 2026

आजादी का अमृत महोत्सव निमित्त भद्रावती भूषण कार्यक्रम

भद्रावती नगर परिषदेचा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

भद्रावती नगर परिषदेचे तर्फे आझादी का अमृत महोत्सव निमित्त भद्रावती भूषण पुरस्कार तथा सांस्कृतिक कार्यक्रम 15 आॅगष्ट 2023 ला आयोजित केले आहे. भद्रावती भूषण व सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 26 जानेवारी 2003 ते 26 जानेवारी 2020 पर्यंत घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने इतर कार्यक्रमांवर प्रतिबंध घातलेला होता . मात्र यावर्षी भद्रावती नगर परिषदेने भद्रावती भूषण पुरस्कार तथा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट 2023 ला मुरलीधर पाटील गुंडावार लाॅन येथे सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे.

या कार्यक्रमात बालवाडी पासून शाळा महाविद्यालय पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून बालवाडी पासून ( इंग्रजी मराठी माध्यम ) प्राथमिक वर्ग एक ते चार (इंग्रजी व मराठी माध्यम) उच्च प्राथमिक वर्ग पाच ते सात , माध्यमिक वर्ग आठ ते दहा व कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालय असे एकूण पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांनी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी सह यादी तयार करून नगरपरिषद कार्यालयात सादर करावे . तसेच नगरपरिषद हद्दीतील शाळा व विद्यालयातून दहावी व बारावी मधील 90% गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे . याकरिता शाळेच्या याद्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका साक्षांकित करून नगरपरिषद कार्यालयात सादर करण्यात याव्या. सोबतच शहरातील विविध क्षेत्रात कार्य करून भद्रावती शहराचे नाव लौकिक करणारे मान्यवरांचा भद्रावती भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पाच क्षेत्रात विभागण्यात आलेला असून त्यामध्ये क्रीडा क्षेत्रात, संगीत व कलाक्षेत्र ,साहित्य क्षेत्र ,सामाजिक क्षेत्र , विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत व्यक्तिमत्व यांची निवड करण्यात येणार आहे.

तरी इच्छुक मान्यवरांनी नगर परिषदेच्या कार्यालयात आपली नावे सादर करावी. या सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन नगरपरिषद भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!