अन्यथा आंदोलनाचा इशारा
वरोरा :- तालुक्यातील उखर्डा गावातील रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. अवघ्या दोन ते तीन महिन्यातच हे रस्ते पूर्ण उखळले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची व्हिजेटीआय अथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासणी करुन संबधीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी अभिजित कुडे यांनी केली आहे.
उखर्डा रोड मध्ये भ्रष्टाचार प्रकार उघडकीस आले आहेत. या संदर्भात अभिजित कुडे यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.
अभिजीत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, उखर्डा गावातील रस्त्यावर जवळपास १०० मीटर लांब रस्त्याचेकाम ५ महिने आधी झाले आहे. सदरचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले असून, पावसाळ्याआधीच केलेला हा रस्ता पूर्ण उखडला असून त्यातून गिट्टी बाहेर निघाली आहे. ठेकेदाराने हा रस्ता किती निकृष्ठ पद्धतीने केला याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हिजेटीआय आथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, ठेकेदाराने केल्या जाणार्या निकृष्ठ कामांबाबत चौकशी करुन त्याची माहिती लेखी स्वरुपात जाहीर करावी; अन्यथा, प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अभिजित कुडे यांनी दिला आहे.






