उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने सूर्या कोचिंग समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. तब्बल महिनाभर चाललेल्या समर कॅम्प च्या समारोप प्रसंगी डॉक्टर विवेक शिंदे यांनी मार्गदर्शन करताना, ‘समर कॅम्प हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी कशासाठीआवश्यक’ असल्याचे प्रतिपादन केले.
भद्रावती शहरात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे चांगले संस्कार व्हावे, या हेतूने सूर्या कोचिंग समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. या सूर्या समर कॅम्प चा समारोप नुकताच संपन्न झाला. यावेळी मंचावर उद्घाटक डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती. अध्यक्ष डॉ. विशाल शिंदे सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश हटवार , सतीश खेमसकर हे यावेळी मंचावर उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांवर चांगले सुसंस्कार व्हावे, त्यांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे यासाठी अशा समर कॅम्प ची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. विशाल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकाराची माहिती अशा समर कॅम्प च्या माध्यमातून निर्माण होते व ती आवड त्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन केले.
समर कॅम्प च्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी चित्रकला प्रदर्शनी, कला प्रदर्शनी, त्याच प्रकारे गीत गायन, एकलनृत्य, समूह नृत्य व विविध कला, कौशल्याचे प्रदर्शन करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे संचालक दुर्गे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहानी शिरपूरकर तसेच या शिबिरात विविध कला, क्रीडा प्रकार शिकवणारे शिक्षक यांनी सहकार्य केले. यवेळी शिबिरार्थी व पालक , प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






