spot_img
spot_img
23.1 C
New York
Friday, July 31, 2026

स्थानिक नागरिकच रोजगारापासुन वंचित

सुशिक्षित बेरोजगारांवर वेकोली माजरी एरीया प्रशासनाची तलवार

भद्रावती : माजरी मध्ये कोळश्याच्या खानी आहेत करीता वेकोली माजरी एरीया मार्फत खानीतील माती काढने, कोळसा काढण्यासाठी खाजगी कंपन्यांना टेंडर कित्येक वर्षापासुन दिला जात आहे. ह्या कंपन्या बाहेर राज्यातुन कामगार बोलवुन त्यांच्या मार्फत अपले काम काढुन घेत आहे. मात्र गावकरी अथवा स्थानिकांच्या हाताला काम नाही. येथील बेरोजगार कामासाठी वन वन फिरत आहे. या भागात छोट्या मोठ्या बर्‍याच खाजगी कंपन्या कार्यरत आहे. पण त्यांच्या मार्फत स्थानिकांना रोजगारा पासुन जाणिवपूर्वक वंचीत ठेवण्यात येत आहे, असा आरोप गावकर्‍यांमार्फत केल्या जात आहे.

त्यातच काही दिवसापासुन स्थानिक राजकारणी, सामाजीक कार्यकर्ते सयुक्तपने ह्या कंपन्यांकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळविण्यासाठी भेटी घेत आहे मात्र कंपन्यांच्या मालकांना पाझर फुटेल असा तिळमात्र सुद्धा विश्वास उरलेला नाही. बाहेरील राज्यातील कामगारांना काम देऊन स्वराज्यातील स्थानिक सुशिक्षीत, स्किल बेरोजगारांना मात्र डावलन्याच्या रोशाने संयुक्त आंदोलन उभारण्यात आले. मात्र वेकोली प्रशासनाने आंदोलना मुळे वेकोली ला कोळसा उत्पादना मध्ये नुकसान झाल्याच्या आरोपावरुन कार्यकर्ते तसेच बेरोजगारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे गावकर्‍यांमधे, स्थानिक बेरोजगारामधे असंतोष तथा असुरक्षिता निर्माण झाली आहे. कोळसा खानी मुळे माजरी गावातील वातावरण दूषित होऊन पर्यावरणाला हानी पोहचत आहे. तरी सुद्धा पोटापाण्याच्या तथा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कोळसा खानीत काहीतरी काम मिळेल या आशेने येथील जनता वेकोली प्रशासन माजरी एरीया कळे बघत आहे. पण त्याची कुठलिही दखल घेतली जात नसल्याने गावकरी तथा स्थानिक बेरोजगार संतप्त झाला आहे. विशेष म्हणजे वेकोली ने नियम धाब्यावर बसवीनार्‍या कंपन्यांना जाब विचारायचे सोडुन बेरोजगार युवकांचे भविष्य खराब करण्याचे तंत्र हाती घेतले आहे. असे स्थानिक गावकर्‍यांमार्फत सांगण्यात येत आहे व तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Previous article
रोटरी क्लब भद्रावती द्वारे आयोजित माधवबाग दवाखाना यांच्या आरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!!! रोटरी क्लब भद्रावती आणि माधवबाग कार्डियाक क्लिनिक ,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक हुतात्मा स्मारक हॉल इथे रविवारी दिनांक 28/5/2023 रोजीआयोजित हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि लठ्ठपणा रोग उपचार शिबिरात 123 रुग्णांची नोंदणी करण्यात आली त्या पैकी जवळपास 37 रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी शिबिरात करण्यात आली तर अनेक रुग्णांना विशेष तपासण्या साठी चंद्रपूर येथे बोलवण्यात आले आहे.शिबिरात माधवबाग क्लिनिक ,चंद्रपूर चे संचालक आणि प्रसिद्ध Disease Reversal Expert डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे व डॉ. प्रीती सरबेरे यांचे द्वारे रुग्णांची तपासणी करण्यात आली व Disease Reversal व जीवनशैलीतील बदल या विषयावर अमूल्य मार्गदर्शन केले . शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब भद्रावतीच्या अध्यक्ष तथा प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ रोटे, डॉक्टर माला प्रेमचंद मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी रोटरी क्लब भद्रावती चे सचिव रोटे,अनिल धानोरकर,कोषाध्यक्ष रोटे श्री सुधीर पारधी तसेच प्रोजेक्ट डायरेक्टर रोटे श्री प्रकाश पिंपळकर,रोटे,युवराज धानोरकर ,रोटे अमित प्रेमचंद, रोटे सचिन सरपटवार रोटे भाविक तेलंग रोटे किशोर खंडाळकर ,रोटे विवेक आकोजवार रोटे आनंद क्षीरसागर रोटे किशोर भोसकर,रोटे,नामदेव खारकर रोटे,सुनील पोटदुखे रोटे प्रवीण महाजन रोटे विनोद कामडी रोटे गिरीश पवार रोटे रुकसाना शेख,रोटे कोमल नागोसे ,रोटे कीर्ती गोहणे तसेच बाकी सर्व रोटरी क्लब सदस्य आणि पदाधिकारी तसेच शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि हृदयरोग हे सर्व जीवनशैलीचे आजार आहेत व यांना आता घाबरायची गरज नाही. हे आजार आता सहज रित्या शरीरातून Reverse करता येतात. हा महत्वाचा संदेश आज या शिबिराच्या माध्यमातून समाजात पोहचला असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन माधवबाग कार्डियक क्लिनिक चे सामाजिक आरोग्य अधिकारी श्री संजय ठेकाळे यांनी केले तर.आभार माधवबाग कार्डियक क्लिनिक च्या संचालिका डॉ. प्रीती सरबेरे यांनी मानले.धन्यवाद..
Next article
spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!