spot_img
spot_img
29 C
New York
Friday, July 31, 2026

शेतकऱ्यांनी खात्री करूनच बियाण्यांची खरेदी करा – ग्राहक पंचायत भद्रावती

भद्रावती : तालुक्यातील शेतकरी बांधवानी पेरणीकरणासाठी बी-बियाणे व खते त्याचप्रमाणे किटकनाशके काळजीपूर्वक घ्यावी तसेच त्यांनी नामांकित बियाण्याची खरेदी करावी जेणेकरून बोगस बियाण्याचे संकट येणार नाही. पॉकेट सील प्रमाणित केलेले आहे का? याची खात्री करून खरेदी करावी, असे आवाहन ग्राहक पंचायत भद्रावती द्वारे करण्यात आले.

कीटकनाशके यांचे डबे, कॅन हे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी. पक्के बिली वापरलेले बियाणे यांचे नमुने सांभाळून ठेवावे, रिकाम्या पिशव्या व पोती पीक हाती येई पर्यंत फेकू नयेत. कारण त्यावर सर्व तपशील लीहलेला असतो. बियाण्यामध्ये किंवा खतामध्ये काही दोष असल्यास त्याचप्रमाणे काही तक्रार असल्यास किंवा निर्माण झाल्यास यावस्तू आवश्यक असतात. कीटकनाशके त्यावर लीहलेल्या सूचनेनुसार काळजीपूर्वक वापरावी जेणेकरून कोणताही धोका निर्माण होणार नाही. गरज पडल्यास कृषीअधिकारी वा तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

योग्य तक्रार असल्यास मार्गदर्शनासाठी ग्राहक पंचायत भद्रावतीशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकरी ग्राहक बांधवाना अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, ग्राहक पंचायत भद्रावती चे वामण नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, पुरूषोत्तम मस्के, प्रवीण चीमूरकर, सुदर्शन तनगुलवार यांनी केले. तसेच शेतकरी ग्राहकांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करावा असे आवाहन केले.

Previous article
Next article
रोटरी क्लब भद्रावती द्वारे आयोजित माधवबाग दवाखाना यांच्या आरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!!! रोटरी क्लब भद्रावती आणि माधवबाग कार्डियाक क्लिनिक ,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक हुतात्मा स्मारक हॉल इथे रविवारी दिनांक 28/5/2023 रोजीआयोजित हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि लठ्ठपणा रोग उपचार शिबिरात 123 रुग्णांची नोंदणी करण्यात आली त्या पैकी जवळपास 37 रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी शिबिरात करण्यात आली तर अनेक रुग्णांना विशेष तपासण्या साठी चंद्रपूर येथे बोलवण्यात आले आहे.शिबिरात माधवबाग क्लिनिक ,चंद्रपूर चे संचालक आणि प्रसिद्ध Disease Reversal Expert डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे व डॉ. प्रीती सरबेरे यांचे द्वारे रुग्णांची तपासणी करण्यात आली व Disease Reversal व जीवनशैलीतील बदल या विषयावर अमूल्य मार्गदर्शन केले . शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब भद्रावतीच्या अध्यक्ष तथा प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ रोटे, डॉक्टर माला प्रेमचंद मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी रोटरी क्लब भद्रावती चे सचिव रोटे,अनिल धानोरकर,कोषाध्यक्ष रोटे श्री सुधीर पारधी तसेच प्रोजेक्ट डायरेक्टर रोटे श्री प्रकाश पिंपळकर,रोटे,युवराज धानोरकर ,रोटे अमित प्रेमचंद, रोटे सचिन सरपटवार रोटे भाविक तेलंग रोटे किशोर खंडाळकर ,रोटे विवेक आकोजवार रोटे आनंद क्षीरसागर रोटे किशोर भोसकर,रोटे,नामदेव खारकर रोटे,सुनील पोटदुखे रोटे प्रवीण महाजन रोटे विनोद कामडी रोटे गिरीश पवार रोटे रुकसाना शेख,रोटे कोमल नागोसे ,रोटे कीर्ती गोहणे तसेच बाकी सर्व रोटरी क्लब सदस्य आणि पदाधिकारी तसेच शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि हृदयरोग हे सर्व जीवनशैलीचे आजार आहेत व यांना आता घाबरायची गरज नाही. हे आजार आता सहज रित्या शरीरातून Reverse करता येतात. हा महत्वाचा संदेश आज या शिबिराच्या माध्यमातून समाजात पोहचला असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन माधवबाग कार्डियक क्लिनिक चे सामाजिक आरोग्य अधिकारी श्री संजय ठेकाळे यांनी केले तर.आभार माधवबाग कार्डियक क्लिनिक च्या संचालिका डॉ. प्रीती सरबेरे यांनी मानले.धन्यवाद..
spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!